Sunday, 2 April 2017

फ्रेंड रिक्वेस्ट


जवळ जवळ पस्तीस-छत्तीस वर्षांनी आज “फ्रेंड्स?” अशी रिक्वेस्ट पुन्हा करता आली. टेक्नोलॉजी दुसरं काय! खरंतर रिक्वेस्ट म्हणजे विनंती, मैत्रीची विनंती? विसंगती वाटते. प्रश्र्न? माझ्याशी मैत्री करशील? चुकतंय काही तरी, अस विचारून मैत्री थोडी ना होते? मैत्र जीवाचं असत, मैत्री होते, करता येत नाही. मैत्री चा रुकार?, स्वीकार?, होकार? जाऊ दे.

“तू मला माझी मैत्रीण वाटतेस, आपण चांगले मित्र होऊ असं मला वाटतं आणि तुला?” अस प्रत्यक्ष भेटीत विचारलं होतं. हो तेव्हा, पस्तीस-छत्तीस वर्षांपुर्वी, आठवतं? मला चांगलं आठवतंय, ती जागा, तो महाविद्यालयाचा व्हरांडा जिथे मी हा प्रश्र्न तुला विचारला होता. अगदी काल घडल्या सारखा आजही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. अगदी तुझ्या चेहेऱ्या वरच्या अविर्भावासकट. हो, म्हणताना जितंमया! असे भाव होते तुझ्या चेहेऱ्यावर आणि डोळे मिस्कील हसत होते, मी मागून येणार आणि हा प्रश्र्न विचारणार याची जणू खात्रीच होती तुला. किंबहुना माझी वाट बघतच तिथे उभी होतीस तू. खूप राग आला होता मला माझा, इतका कसा मी गृहीत धरला जाऊ शकतो? पण तू हो म्हणालीस ह्याच्या आनंदात तो राग कधी विरून गेला ते माझं मलाच कळल नाही. खूप खुश होतो त्या दिवशी. मित्रांनी खूप खेचली, पण कुणा कुणाचाही राग नाही आला.

पुढचे दिवस खूप वेगाने गेले, मैत्रीचे रुपांतर प्रेमात वगैरे. इतर युगुलांच्यात आणि आपल्यात एक फरक होता निदान मला तरी तसं वाटत, चुकत असेन कदाचित. मैत्री करता मी हात पुढे केला, तेव्हढाच काय तो माझा पुढाकार. ब्रेकप, प्रपोज  काय जे आज कालची मुलं मुली एकमेकांना सारखी करत असतात ते सगळ तूच केलस. तू विसरली सुद्धा असशील, इतक्या सहज, बेफिकीरीने  विचारलं होतसं, काय तर “माझं हो आहे, तुझं ?” मी नाही म्हणालो असतो तर? तू नाही म्हणशील या भीतीने माझ विचारायचं कधी धारिष्ट्य झालं नव्हतं, त्यामुळे मी नाही म्हणायचा सवालच नव्हता. हे ही बहुदा तुला माहित होतं.

विसरली असशील, मी मात्र अजून त्या पायऱ्यांशी घुटमळतोय. पुन्हा संधी मिळाली तर? उगाच काय विचार करायचा, आत्या बाईला मिशा असत्या तर ... त्यातली गत. त्या नंतरचा अगदी प्रत्येक क्षण वगैरे नाही पण बरेच प्रसंग मात्र आजही स्मरणात कायम आहेत. नाही म्हणायला काही क्षण चिमटीत तसेच धरून ठेवलेत, पावसात चिंब भिजून घरी परतल्यावर, निरोप घेताना तुझ्या डोळ्यातून जे काही बोललीस, शब्दात सांगणं  अशक्य आहे, इतकं सांगितलंस. जर तुझ्या दारात उभा नसतो, तर कृतीनेच उत्तर दिलं असत. तुझ्या वाढदिवसाला सकाळी उठल्याबरोबर नेमकी आठवण होते, अजून नाही विसरलो ती तारीख.

भेट, पुनर्भेट दीर्घ असावी आणि निरोप थोडक्यात उरकावा, भावनांच्या लाटांनी निग्रहाच्या भिंती कोसळण्यापूर्वी वेगळं होता आलं पाहिजे. असं मानणारा मी, किती वेळ रेंगाळलो. तू मात्र, गळ्यातला एखादा बहुमोल अलंकार हलकेच काढून ठेवावा किवा भेट म्हणून मिळालेल्या नाजूक कलाकुसर केलेल्या काचेच्या  शोपीस वरच्या रिबिनीची गाठ अलगद सोडवावी इतक्या हळुवारपणे त्या नात्यातून बाजूला झालीस. काही काळ जावा लागला मला उमजायला कि मैत्री संपलीय? दुःख झालं ? नाही नेमकं तसंही नाही म्हणता येणार, माझ्या अपेक्षेपेक्षा फारसं वेगळ काही घडल नव्हतं तरी देखील आत खोलवर काही तरी मोडून पडलं. मी कायमचा बदललो.

नाही! मी तक्रार करत नाही. म्हणशील, इतकी वर्षे काय हाच विचार करतं होतास? साचलेल्या पाण्यासारखा? जीवन कस प्रवाही असावं, तूच म्हणायचीस की आणखी कुणी? नाहीं आठवतं. नाही, खरचं अजिबात तक्रार नाही. मी माझ आयुष्य मजेत जगतोय. तुला बर वाटावं म्हणून नाही म्हणत. सुखी संसार केलाय, करतोय. आम्ही सगळेच खूप आनंदी आहोत, एक मेकांवर भरपूर प्रेम करतो.  अनेक भाव भावनांचे अर्थ खरेतर लग्नानंतरच कळले.

तुझ्या मनात आलं असेल ना इतक्या सगळ्या आठवणी कुरवाळत कस शक्य आहे? लग्न करून सुखी संसार वगैरे? तू कधी सिमेंटच्या गीलाव्यावर उठलेली कुत्र्या, मांजराची क्वचित कधी तीन बोट असलेली, कबुतराची किवां कोंबडीची पावलं बघितली असशील. तसचं काहीस आहे हे. माती मऊ ओली असताना उठलेले ठसे आहेत, चिन्ह आहेत,आठवणी आहेत. त्यामुळे त्या तश्या रहाणं  स्वाभाविक आहे. आता वाळून कडक झालेल्या गिलाव्याला त्याच दुःख नाही किंबहुना जाणीव देखीलं नाही.


हां, आता अधेमधे कधी कमी जास्त पाऊस झाला तर पाणी वाहून जातं, गिलावा पटकन सुकतो, पण या पावलांत मात्र पाणी थोडं जास्त काळ राहातं इतकंच काय ते.

Saturday, 25 March 2017

खारे दाणे


स्टेशन ते माझे घर चालत साधारण दहा ते बार मिनिटांच अंतर, जलद चालणाऱ्यां करता त्याहूनही  कमी. मार्केटातून  गेलो तर थोडं जास्त. इतक्या अंतरात देखील एके जागी माझे पाय अचानक थांबतात खरं तर वळतात. एखादया मद्यपी माणसाचे पाय गुत्त्याकडे  वळावेत तद्वत माझे पाय पार्लेश्वर मंदिरा समोरील चणे-दाणे  वाल्याकडे  वळतात, आणि हे असे आजच नव्हे तर मी कमवायला लागल्या पासून गेली कित्येक वर्ष चालू आहे. जर मी स्टेशन वरून चालत आलो तर मंदिरा समोरच्या त्या भडभूंज्याकडे  खारे दाणे घेतल्या शिवाय माझे  पाउल पुढे पडतच नाही.

मला आठवतं ते पार्लेश्वराचे  जुने देऊळ आणि त्याच्या समोर बैठ्या चाळी सदृश्य इमारतीत असलेला हा चणे दाणे वाला. कमरे इतकी उंची असलेल्या भट्टीच्या बाजूला उभे राहून  रेतीने भरलेल्या  कढईत लोखंडी चाळणीने वर खाली करत दाणे भाजणारा भय्या, हे नित्य दिसणारे दृश्य. आता ती चाळ जाऊन तिथे ऊंच इमारत ऊभी आहे, देऊळ देखील खूप प्रशस्त झालं आहे पण तो चणे-दाणे वाला आहे तिथेच आहे, चणे-दाणे विकायला बहुदा त्याची मुले बसतात. बदल म्हणावा तर चण्यादाण्यांबरोबर आता तो शेव, फरसाण , पाणी पुरीच्या पुऱ्या व तत्सम काही बाही विकतो. खाऱ्या दाण्यांची चव आणि खाणारा मी, मात्र तोच आहोत, फरक म्हणाल तर तेंव्हा १० पैशाचे दाणे घेत होतो आता तेव्हढेच दाणे पाच रुपयाला घेतो.

दाणे खात खात घरी जाण्यातली गंमत काही और आहे. मी दाणे सोलून खातो, हो साले रस्त्यातच टाकतो, चूक आहे, पण बायोडिग्रेडेबल का काय जे म्हणतात ना, तसा कचरा आहे हा, म्हणून स्वतःला माफ करतो. खारे दाणे खाण्याचे  काही नियम आहेत. सोलून तोंडात टाकलेला पहिला दाणा संपता संपता दुसरा दाणा तोंडात गेला पाहिजे, दाणा तोंडात टाकतना थोड्या अंतरावरून तो तोंडात गेला पाहिजे,ओठांना हात न लागता. खाण्याचा वेग इतकाच असावा की दाण्यांचा तोबरा होता कामा नये आणि सर्वात महत्वाचा दाणा, म्हणजे पुडीतीला शेवटचा दाणा. चालता चालता तो दाणा खाणे हे एखाद्या बारीक कलाकुसर करणाऱ्या कारगिराला सुद्धा आव्हानात्मक ठरेल इतके कठीण, डाव्या हाताने पुडीचे तोंड  झाकलेले हवे व उजव्या हाताची तर्जनी व अंगठा यांच्या मदतीने पुडीचे शेवटचे टोक घड्याळ्याच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेला इतकेच फिरवावे की टोकाला अडकलेला  दाणा तिथून निसटावा पण पुडीच्या उघड्या तोंडातून त्याने रस्त्यावर आत्मघातकी उडी मारू नये. घडू नये, पण तसे घडलेच तर ते  दुःख शब्दात मांडणारा शब्दप्रभु माझ्या वाचण्यात अजुन तरी आलेला नाही. असो, तो शेवटचा दाणा जग जिंकल्याच्या थाटात तोंडात टाकता टाकता  डाव्या हाताने पुडीचा चोळा मोळा होऊन तो बोळा रस्त्याच्या कडेला फेकला गेला पाहिजे. (आता कचऱ्याच्या डब्यात जातो, घरी पोहोचल्यावर).

काल संध्याकाळी देखील, मी नेहमी प्रमाणे दाणे खात खात निघालो, थोडा पुढे जातो न जातो तर काकूंची हाक कानावर आली. देवळातून दर्शन घेऊन काकू घरी निघाल्या होत्या. काकू, म्हणजे आमच्या शेजारच्या दामले आजी, खरंतर त्यांना आजीच म्हणायला हवं, पण का कोणास ठाऊक,आम्ही सगळे त्यांना काकू म्हणतो. घरातील मोठे त्यांना काकू म्हणतात म्हणून असेल कादाचित. दामले काकूना आम्हा भावंडाचे खूप कौतुक, त्यांना स्वःतला मूलबाळ नव्हतं. मला आठवत, सहावीत जाताना माझी एक तुकडी  गेली तेव्हा माझ्यापेक्षा त्यांनाच अधिक दुःख झालं होतं. माझी समजूत काढताना म्हणाल्या, "गेली तर गेली, चारशे मुलांच्यात तू एकवन्नावा तर आहेस" (५० मुलांची एक तुकडी होती, सहावीमधे  दुसऱ्या तुकडीत गेलो होतो). मी थांबून मागे वळलो, चालत काकूंच्या जवळ गेलो. "काय हो काकू?, पिशवी घेऊ? "
"छे रे, असं काय वजन घेऊन चालले आहे? आणि हे रे काय ?" माझ्या चेहऱ्यावर भले मोठ्ठे प्रश्न चिन्ह, पटकन कपड्यांवर नजर टाकली काही पडलाय का?
"काय काकू?"
"बँकेत एव्हढा मोठ्ठा ऑफीसर तू आणि रस्त्यातून दाणे खात काय चाललायस? लोक काय म्हणतील?"
"काकू, दाण्याचा इतका खमंग वास आला की अगदी राहवलं  नाही, नेहमी नाही खात काही" धडधडीत खोट, पण काकुंच समाधान झालं .
"असूदे रे, माझ्या मेलीच काय ऐकतोस, मनात आलं म्हणून बोलले, राहूदे, बरं  चाललाय ना?"
"हो काकू" थोडा अवघडलो, काकूंच्या चालीने चालायचं म्हणजे? माझी अडचण त्यांच्या लक्षात आली. "अरे गेलास तरी चालेल". पडत्या फळाची आज्ञा मानून मी तिथुन पाय काढला.

प्रसंग अगदी छोटा, का खातो मी दाणे? कारण कदाचित माझ्या बाळपणाशी निगडीत असावं. लहानपणी हट्ट केल्याशिवाय दाणे मिळत नसत, आणि मिळाल्या नंतरचा आनंद! काय वर्णावा तो, अगदी  समाधी अवस्था. जिभेवर रेंगाळणारी ती खारट चव, दाणे कधी संपूच नयेत असच वाटायचं. किती सोप्प होत आयुष्य,आनंद मिळवणं. आज दाणे  खाताना बहुदा खोल कुठेतरी ते तणाव मुक्त बालपण पुन्हा अनुभवास येत असाव. दाणे हे माध्यम बनते माझ्या बाळपणाच्या अनुभूतिशी जोडणारे, नकळत पुनः प्रत्ययाचा आनंद देणारे, खरंच सांगतो, दाणे संपेपर्यंत, माझा ह्या व्यवहारिक जगाशी सम्बन्ध तुटतो आणि नकळत मी तणाव, चिंता ग्रस्त - माझ्या पासून खूप खूप लांब जातो. असेल का असं? अंन्तरमनात कोणत्या गोष्टीची  सांगड कशाशी घातलेली असेल सांगणं,  फार कठिण आहे. माझ्या बाबतीत म्हणाल तर खारे दाणे आणि तणाव, चिंता, भीति मुक्त स्वच्छंदी जगणे ह्यांची कुठेतरी खास जोडणी आहे. दाणे देखील खूप सारे नाहीत त्या पुडीत मावतील इतकेच, नाहीतरी मनाची तरल अवस्था फार काळ टिकायला मी योगी थोडाच ना  आहे?

Saturday, 11 March 2017

Dream Merchants


I feel today is the right moment to write my last post on the subject. Elections across the country are more or less over, results are out, exit polls and trends don't matter anymore.

The game has reached penultimate stage before the party begins. Drawn swords are about to be scabbard, dried blood is being cleaned to pretend that there wasn’t any blood on them. We never fought, we were always together!!

Politicians will take the back sit and tough negotiators will be in forefront, wherever none of the parties have secured clear mandate.  Those who have read my earlier post will remember I had written that in politics, enemies or opponents are never forever, it is always a marriage of convenience or clash of interests. There is no way out for poor voters even though they keep experiencing this, election after election.

There is nothing new!!

You will find analyst analysing election results, after every election, I don’t know whether you have noticed some of the common terms you keep hearing during the analysis ‘anti-incumbency vote’, ‘polarisation’,  ‘vote Banks’, ‘wave’, ‘swing’ and after Mr. Modi’s entry on the stage ‘Development’, ’Change’ have become buzz words.  Voters have once again proven exit polls wrong, exit polls are for media. Debates and discussions are seen, heard and enjoyed by public generating great TRP. According to me exit polls are popular because of our desire or longing to peep in to future. Whoever or whatever is apparently successful in creating an illusion of being a prophet or a seer can easily be the crowd puller. The way any fortune-teller under Banyan / Peepal tree brags about the only correct prediction (that too by utter coincidence), media channels do exactly the same.

Most of the analysts believed that, though all the political parties during their campaigns, talked about development, progress of the region, law and order, equality these were only side dishes, main course continued to be polarisation based on cast, religion and economic disparity. Every one of the parties tried the recipes. Political party, which could get the ingredients and cooking time right, finally won. There is more to elections held in India. Sketchily, what analyst say may be true but there is another angle as well. The one, which is ignored by all of them.

Today analysts and intellectuals from all walks of life are debating yesterday’s results. They have come across contradictions. But unfortunately they are not ready to check their premises. If you ask me, we vote for dreams. Indian voters vote by heart. We are idol worshipers. We create heroes and we worship them. Time and again we have proved it. We have sympathy wave, anti-incumbency wave, which runs across the country.  We have landslide victories and we have most unexpected result. Results which can’t be substantiated by any facts. The reason is we vote by hearts. We are emotional. Emotions are not predictable. Emotions are contagious. We believe. No wonder Mahatma Gandhi was great success in India and no wonder he was assassinated. Whoever or whichever party is successful in projecting common man’s desires into dreams, illusions will succeed. ‘Garibi Hatav’, God knows how many different forms it has taken and mind you, every one of them has sold like a hot cake. Contest is of marketing, one who is able to market these dreams is the winner. ‘Dream merchants’ are true winners in our country. Till 1984 we had dream merchants from the same family. Then there was a lull. Enormous gap till 2014. We witnessed successive coalition Governments during the period. Quite a few dream merchants were and are at regional, State level. Maharashtra, Andhra, Tamilnadu has seen a few.  These were Retailers. Whole Sellers are few and apart. We are witnessing one right now.

No don’t get me wrong, being a dream merchant is not, being a cheat, it is just the way to come to power. One has to make voters believe that he is messiah, he is the one who will free them of all their worries and qualms. This is the one or rather the only essential required to come to absolute power.  Unless one has absolute power he cannot work on his agenda. Being a dream merchant is just the way. It doesn’t end there. Once you come to power, you have to deliver else you will be out of stock.

Let us hope these are early morning Dreams!!


Tuesday, 21 February 2017

Honoured My Duty

Yes, I did go to identified voting booth and punched the button to seal my choice of Candidate. No, no it was not NOTA, those who have read my earlier blog ‘Duty to Vote’ may have one of the following questions in mind, what changed overnight that I was able to make a choice? Whether one honourable candidate worthy of my choice, who was not there till 2 days ago, suddenly materialised on EVM? Whether Political party consistent in ideology and deeds came in to existence having desirable candidate? That I was actually able to make my choice?

To tell you the truth, till yesterday evening, I had decided to go next day morning to voting booth press NOTA and register my protest against the system. I had forgotten, I am part of the system, I am blaming, without me system is not complete, and I had decided to go ahead. I would have done that as well, but for my encounter with auto driver yesterday evening.  Anecdote goes as under;

I hailed an auto rickshaw to go to my mother’s place around 5-6 KM.s from my residence.  As usual the moment our auto rickshaw came out of the lane, we hit traffic jam on the main road. Snarled traffic ensured that I will be accompanying auto driver for another 30-45 minutes. That wait, noise of honking cars and general commotion in the air, I had to make it bearable.  I think he also became aware of the fact that he had nothing to do as we were hardly moving a foot or so in a minute.

 “क्या साब कल किसको वोट करेंगे ? वोट करेंगे न आप ?”

He had broached the topic close to my heart that I had to respond. After all, human being is a social animal. I had to vent out my frustration,

 “छोड़ न एक भी उमीदवार लायक नहीं है , सब के सब चोर ही लगते है, और तो और उनकी पार्टी उनसे भी ख़राब। हर जगह भ्रष्टाचार है उमीदवारो के  बारे में सच क्या और झूट क्या पता ही नहीं  चलता। ऐसी एक भी पार्टी नहीं है जीसका भरवसा कर सके। कैसे करे हम वोट?  कल छुट्टी मिली है| जल्दी इलेक्शन बूथ जायेंगे नोटा दबाएंगे और घर आ कर खा पी कर मस्त आराम करेंगे”

“साब छोटा मुँह बड़ी बात, आप से उम्रमे बड़ा हूँ इसलिए बोलने की जुर्रत करता हूँ, चुप होनेको कहोगे तो चुप हो जाऊंगा। यह सब आप लोगोंकी गलती है ”

I was shocked, how could he say that? Option was, I could have asked him to shut his mouth, he only had given me the right, but I was curious. He had charged me and now he had to explain,

“ऐसे कैसे कह सकते हों? हम तो अपनी नोकरी करते है, सरकार जो  भी टैक्स मांगती है वो भरते है सरकार जैसे रखती है वैसे रहते है क्या गलत करते है हम, हमारी कोई गलती नहीं है”

I found myself suddenly on defensive,  some where inside I had a feeling I was wrong, I had to listen to him.

“साब आज़ादी के तुरंत बाद एक हि पार्टी थी मेरा मतलब बाकि जो भी थी, नहीं के बराबर थी । चुनाव तो तभी होते थे, हरेक उमीदवार आज़ादी की जंग में सैनिक रहे चूका था, देश प्रेम से भरा था और दूसरी तरफ आम जनता थी, हरेक मतदाता ने चले जाव का नारा लगाया था या कमसे कम सुना था  कुछ और था सब"

He was lost for a moment. I was wondering, no doubt he was old but definitely did not look like one who could have participated in Chale Jav movement. I had to ask him. Now my tone was different, I couldn't place it, may be respect, may be curiosity but definitely not the way one talks with auto drivers.

“ ये सब आप कैसे जानते हो?"

“साब बहूत लंबी कहानी हैं, बस इतना जान लीजिये की मेरे बाबा आज़ादी की जंग में थे अंग्रेजोंको चले जाव कहने वालो  में सबसे आगे थे और पुलिस की लाठी खा खा कर अपाहिज हुए थे, अब इस दुनिया में नहीं रहे। बाबा बताते थे सब कहानिया। सीना चौड़ा करके कहेते थे कैसे गाँधी के एक वचन पर हस हस कर लाठिया खाने को तैयार रहते थे। कभी गलती से भी सरकार को या  समाज को उन्होंने कटघरे में खड़ा नहीं किया, ना कभी अपनी अपाहिजता का दाम लगाया। ”

“साब मेरे पीछे तीन बहने है उत्तर प्रदेश में एक गांव में घर है हमारा, जबसे दुनियादारी समझ ने लगी तब से काम कर रहा हूँ घर चला रहा हूँ , तीनो बहेनो की शादी की और पिछले २० सालोंसे रिक्षा चला रहा हूँ। ”

I thought of asking him whether he was married, but abstained myself from interrupting him. 

“छोड़िये साब हमारा रोजका रोना है। तो क्या बता  रहे थे हम? "

He answered his own question.

"हाँ  आज़ादी के तुरंत बाद के दिन ”

I was stunned, auto driver was son of freedom fighter, who was invalidated due to lathi charge by police during Chale Jav movement. Brave man, was not even complaining about the struggles he and his family has gone through and are still going.

He continued...

“कुछ साल बाद विरोधी पार्टिया भी बनने लगी । क्या बताऊ साब, तब  लीडर लोग भी कैसे कैसे थे, हरेक की आसमान छूने की ऊंचाई किस किसका नाम लूँ जवाहर लाल नेहरू, वल्लभाई पटेल, जयप्रकाश नारायण, लाल बहादुर शास्त्री, राम मनोहर लोहिया, श्यामा प्रसाद मुखर्जी, दिन दयाल उपाध्याय, अटलजी… "

He went on and on, I was unable to make out what he trying to say. I interrupted him

“आप आजके स्थिति को हुए दोषी करार करे हो बोलो हमारा कसूर क्या है ?”

I made a feeble attempt to protest. He continued with remorse

“क्या बोलू साब आप तो पढ़े लिखे है फिर भी नहीं समझते। जितने लोगोंके नाम हमने अभी लिए सब के सब उच्च शिक्षा विभुषित चाहते तो अपने लिए महल खड़ा कर सकते थे फिर भी उन्होंने समाज कारन और राजकरण में रूचि ली। रूचि ही नहीं बल्कि अपना सर्वस्व  त्याग  दिया। पैसोंसे जो भी चीज हासिल हो सकती थी वह वो पा सकते थे लेकिन उन्होंने ऐसा नहीं किया। हां साब वो माहोल कुछ और था लोगोंके दिलो दिमाग पे देशप्रेम का भूत सवारा था, और आज देखो, कितने उमीदवार उच्च शिक्षित, उच्च शिक्षित छोड़ दो साब कितने  तो साक्षर  भी नहीं होंगे। क्युँ  पहुंचे इस स्थिति में हम? साब सोचो जरा आप जैसे लोग जिन्हें पता है की गलत क्या और सही क्या, दूर रहते संघर्षसे है और चाहते है सिस्टम सुधर जाये। साब गलत हो रहा है सब, साब हम तो अनपढ़ गवार है, रिक्षा चलाने के सिवाय कुछ जानते नहीं। लेकिन आप, आप तो पढ़े लिखे हो सब जानते हो और कुछ करते नहीं हो. हम जैसे अगर सुधार की अपेक्षा करे, तो किससे करे?  जो खुद बिगड़े हुए है या जो समज़ते है की सही क्या है? ”

"साब कुछ जादा ही बोल गया, माफ़ी चाहता हूँ। लेकिन हमेशा से चुभता था, आज आप मिलगये और वो भी ट्रैफिक में फसे हुऐ। बोल दिया माफ़ करना।

He was apologetic, sincerely feeling bad about liberty he had taken. I had no words to answer him, fortunately I had reached my destination with lot of difficulty I managed

“नहीं नहीं कोई बात नहीं ठीक है जो आप को लगा वो आपने बोल दिया ”

I was trying to salvage some of the self-respect I felt I had lost. I paid him whatever was the fare, didn’t dare to tip him, I was sure he would have refused.

I was restless throughout the night couldn’t sleep properly. Was it really true? Whatever he has said, was I really to be blamed for the current situation. He was true, this country had seen towering leadership which every other country will envy, and that too in such numbers. Unfortunately today, today we don’t even have one who can match their shadow and that is the reason none of the parties can complete banners without photos of these leaders live or otherwise. Am I really running away from making the choice and taking the responsibility to enforce my right to demand clean and honest governance? Was it the easy way, NOTA? I must vote, must make my choice, at least make the beginning. Decision was made and I was engulfed by long awaited sleep. 


Today morning I honoured my duty to Vote!!                                      


Sunday, 19 February 2017

Duty to Vote

In Democracy elections are inevitable and inescapable is the preceding propaganda. Candidates in the fray may have been friends / supporters just a day before. They may have shared /enjoyed or exercised authority/power together till yesterday evening and today? Today we find them at each other’s throats, moment elections are declared, candidature is affirmed and enemies (contesting parties) are confirmed.  Esteemed leaders of yesterday are frauds and cheats today!

Where is the common man? The campaigns launched by candidates keep bombarding electorates with facts and figures indicating how incompetent, corrupt and insipid contestants in the arena are. Every one of the candidate is out to prove how best he is at smearing his opponent with all possible dirt he can amass. How good they are at washing their dirty linen in public. At times it gets so low that one forgets that criticism directed to the person occupying Prime minister’s chair is belittling the chair across the world.  Let it be failures, corruption / criminal charges or character assassination, it goes on and on till the day before election. The common man is befuddled, as he sees none of the candidates worthy of representing him. In the process for the common voter all the contestants are reduced to a bundle of corruption, incompetence and without any hopes of finding Mr Right for the job.

But electorates have to vote, perform the noblest duty thrust upon them by the Democracy.

Yes! There is NOTA (None of The Above), option came in existence from 2009. Voter can choose ‘NOTA’ if he doesn’t find any candidate worthy of his choice. What does this mean? It means Voter has exercised his right to vote (Performed his noblest duty) without electing any one as his choice. Its just a via media and means nothing. NOTA effectively is considered as ‘invalid vote’. In other words if 90% of voters have hit NOTA, candidate securing maximum votes out of remaining 10% votes wins, though it means we have candidate with minority support representing majority of electorates not choosing him. What can be more ironic? Small change can make a big difference, give some power to NOTA. If NOTA is more than 50% of votes caste, all the candidates in the fray in that constituency will be disqualified for contesting election and fresh mandate will be sought in the constituency with fresh list of candidates! At least political parties will think before identifying their candidate! 

But electorates have to vote, perform the noblest duty thrust upon them by the Democracy.


Poor hapless voter looks around for some basis to make his choice and turns towards the political party represented by the candidates. Scene is not different yesterdays’ alliances are today's opponents and today's opponents may well be tomorrows alliances. Voter may have preferred one party to another in the process of election and in post-elections scenario he finds both the parties merrily enjoying power together. Election manifestos are just to lure voters, enforcement on the proclamations in the manifesto are totally absent. Regrettably religion / cast are playing major role in deciding election result and not development agenda. No party abstains itself from using religion/ cast card, apparently it’s a trump card (no pun intended).

But electorates have to vote, perform the noblest duty thrust upon them by the Democracy.


Democracy, in most of the countries have come a long way, particularly after full enfranchisement was won for all adult citizens. Democratic citizenship has reached masses from elite class. Legal equality, political freedom and rule of law are the three pillars of Democracy. Unfortunate miserable voter in India is forced to ask, whether we are really matured enough for Democracy, the highest form of government. Do we deserve democracy? Honestly if we have to answer, answer is NO. Governing is a professional activity, candidate(s) aspiring to be part of it must have country as first priority. Nothing comes before the Nation. Authority is to exercise and not to relish, power is responsibility to do good, onus to protect. Politics is a serious business with more responsibility and less fun. Ministers holding offices with global exposure such as PM, FM, Defense, Foreign affairs etc. should stay away from state level elections and political parties should abstain criticizing such office-bearers. Yes, healthy criticism is welcome about the policies, decisions made etc. nothing should be at personal level which will insult the chair they are holding. 

As a future minister, one should talk about what he plans to do and how well he can do it, rather than what opponent has not done or not achieved. One has to bear in mind that we are talking about Nation. We can built only over whatever our predecessors have done or we may improve on it or add to it. No one can make or break country in one's life time. Yes, we can initiate something new, which we may or may not finish during the tenure and our successors will have to take it forward. Healthy contest is what we need. Acknowledge what is already done, point out what is wrong and vouch given the opportunity to rectify it.

Talk about value additions and not about mutilation. Talk about good practices, talk about development encompassing one and all. Talk about inclusion and not exclusion. Talk about equality, freedom with responsibility and talk about law and order. People who understand this should take politics as career, should actively participate and lead by example.


Making a choice or to elect is process, it involves weighing of pros and cons to arrive at conclusion. It is the process of selecting right person (whom we believe to be right) for the job. It’s a way to entrust somebody with responsibility with full faith about his capabilities and integrity. If I may add its giving an opportunity to a person to work for his country or his electorate.  Enable electorates to go through the process, give them a CHOICE to elect and then insist on performance of the noblest duty to vote thrust upon them by the Democracy.

We will be happy to Vote! Contribute in our own way to strengthen Democracy