Sunday, 21 January 2018

शल्य


मला प्रत्येक व्यक्तीत एक ‘शल्य’ डोकावताना दिसतो. तुम्हाला कधी दिसलाय  का? ‘शल्य’ जो दुसऱ्याचा पाणउतारा करण्याचा सदोदित प्रयत्न करीत असतो. दुसऱ्याचा तेजोभंग करण्याची, तुलनात्त्म्क कमीपणा दाखवण्याची एकही संधी तो सोडत नाही. खरतर आपल्याला त्याचे अस्तित्व जाणवत असत पण त्याला विरोध करण्या ऐवजी आपण त्याच्या आहारी जातो आणि मग उरतो तो नात्यातला कडवटपणा, वितुष्ट आणि दुरावा.

अनेकांच्या बाबतीत, मनातील हा ‘शल्य’, ज्याच्या मनात असतो त्यालाच दुजा भावाने टीकेचे लक्ष्य करतो, स्वतःत असलेल्या नसलेल्या हिंनतेच्या, कमीपणाच्या भावना जोर धरू लागतात, परिणामतः  आत्म बलाचा निचरा होऊन खच्ची करण व्हायला वेळ लागत नाही.

‘हा’ शल्य कुठून आला?

प्रश्न पडला ना? शल्य म्हणजे बोचरं दुःख, सल. सतत टोचत राहणार दुःख ते शल्य. किंबहुना त्याला शल्य का म्हणतात? 

वरील प्रश्नांची उत्तर मला महाभारतात सापडली. महाभारत वाचताना मला पदोपदी रूपक आढळतात. दर वेळेला वाचताना काही न काही नवीन सापडते. महाभारतकार महाकवी व्यासांनी हेतुपुरस्सर पात्रांची योजना केलेली आहे. प्रत्येक पात्र, प्रसंग, घटना क्रम इतका विलक्षण आहे कि वाचाक अवाक झाल्याशिवाय रहात नाही. नाना विविध रूपकांचा उपयोग करून मनुष्य स्वभाव, विकारांच विश्व नेमक उलगडून दाखवल्याच याहून अधिक चांगले दुसरे उदाहरण माझ्या वाचनांत तरी नाही.

शल्य हा मद्र देशाचा राजा, पंडू पत्नी माद्री चा सख्खा भाऊ. नकुल, सहदेव यांचा मामा. बलाढ्य, शूर, लढवय्या, अश्व कला जाणणारा, उत्कृष्ट सारथी. पांडवांचा चाहता, हितचिंतक आणि पांडवांच्या विजयाची सतत कामना करणारा. कौरवांच्या राजकीय खेळी मुळे, महायुद्धात कौरवांच्या बाजून युद्धात उतरलेला, पण मनोमन पांडवांच्याच बाजूचा. असा ‘शल्य’ हे एक अद्वितीय रूपक आहे असे मला नेहमी वाटते.   

दुर्योधनाने ज्यावेळी कर्णाला कौरव सेनेचा सेनापती होण्यास सांगितलं तेव्हा कर्णाने दुर्योधनाशी, स्वतःच्या व अर्जुनाच्या बलाबलाची चर्चा करताना, कृष्णाच्या तोडीचा सारथी माझ्याकडे नाही अस तक्रारिचा सूर लावला आणि शल्याने त्याचे सारथ्य करावे अस प्रस्तावही मांडला. कृष्णाच्या तोडीचा एकमेव सारथी आपल्याकडे आहे आणि तो म्हणजे शल्य अशी पुस्ती देखील त्याने जोडली. दुर्योधाने नाईलाजास्तव शल्याला गळ घातली. शल्याला दुर्योधनाची विनंती मान्य करण्यावाचून पर्यायच नव्हता. राजाने सारथ्य करायचे? मनातून पांडवांच्या पक्षातील, साहजिकच शल्याने एक अट घातली, “सारथ्यात मी कमी पडणार नाही पण मी कर्णाला काहीही बोललो तरी कर्णाने मला उलट बोलता कामा नये, ज्या क्षणी तो उलट बोलेल त्या क्षणी मी रथाचे लगाम खाली ठेवीन”. कर्णाकडे हि अट मान्य करण्यावाचून गत्यंतरच नव्हते.

प्रत्यक्ष युद्धभूमीवर, शल्याने आपल्या तोंडाचा पट्टा चालू केला, कर्णाला, शल्याचे एकामागून एक वाक्बाण घायाळ करत होते. त्याचा तेजोभंग करण्याची एकही संधी शल्य सोडत नव्हता. अर्जुनापुढे कर्णाचा निभाव कसा लागणार नाही ह्याचा पुनरुच्चार तो करीत होता. ज्याने सारथ्य करून कर्णाला पुढे न्यायचे तोच कर्णाचे पाय ओढत होता. या परीस्थितीत देखील कर्णाच्या पराक्रमाने स्तंभित होऊन शेवटी शल्याने त्याची स्तुती केली आणि युद्धात अर्जुनाच्या विरोधात एक मौलिक सल्ला त्याने कर्णाला दिला, पण सतत निर्भत्सना ऐकल्यामुळे कर्णाने त्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल. मनाच्या संभ्रमित अवस्थेत वेगळे काही घडणे अपेक्षित नव्हते.

महाप्रतापी, धनुर्धारी कर्ण हा पांडवांच्या कौरवांवरील विजयाच्या मार्गातील एकमेव अडथळा उरला होता. युद्धाच्या आधीच कृष्ण आणि कुंतीने कर्णाच्या मनात संदेह निर्माण करण्याचे काम केलेले होते. मनाच्या संदिग्ध अवस्थेत कर्ण युद्धात उतरला आणि राहिलेली कसर शल्याने भरून काढली. 

कर्णाच्या मृत्युला जेव्हढे रथाचे रुतलेले चाक कारणीभूत होते तेव्हढाच किवा रत्तीभर जास्तच शल्य जबाबदार होता (रथाचे चाक रुतले तेव्हा सारथ्य शल्याकडेच होते, असो).
कर्णाच्या मृत्यूला कारणीभूत झालेला हा शल्य, खरच व्यक्ती आहे की एक रूपक? कर्णाच्या मनातील द्वंद्व? कि व्यास मुनीना काही वेगळ सुचवायचं आहे?, मनावर ताबा ठेवणारी (सारथ्य करणारी) बुद्धी जर विरोधात उभी राहिली तर पराभव करायला बाहेरील शत्रूची गरज नाही, तो केवळ निमित्त मात्र ठरेल. यशापयश हे परिस्थितीपेक्षाही मनाच्या काय स्थितीत आपण प्रसंगाला सामोरे जातो यावर अवलंबून आहे. नेमक हेचतर त्यांना सुचवायचं नसेल? 

Saturday, 27 May 2017

पिंपळपान



मराठीत पिंपळ, शास्त्रीय भाषेत फायकस रेलीजीओसा, अंजीर वर्गातील भारतीय उपखंडात आढळणारा वृक्ष. संपली विकिपीडिया मधे मिळणारी माहिती. अश्वत्थ वृक्ष, बोधी वृक्ष हि देखील याचीच नाव. गौतम बुद्धांना याच वृक्षाखाली बोध झाला म्हणून बोधी वृक्ष.

पिंपळ म्हटला कि डोळ्यासमोर ऋषीतुल्य, तटस्थ, धीर गंभीर प्रतिमा उभी राहते. गूढ थोड्याशा भितीदायक वलयात लपेटलेला. स्वतःच्या नादात कुठल्यातरी वैश्विक (cosmic) आनंदात नर्तन करीत असतो. सळसळ म्हटली कि ती पिंपळाची, पानांच्या आवाजाला नाव असलेला एकमेव वृक्ष. या पानांचा हृदयाकार आणि त्याचं लांब देठ हे या वारा नसताना थरथरण्या मागच रहस्य असेल कदाचित पण मला मात्र ती नेहेमी काही सांगत आहेत असं वाटतं. पिंपळाची सळसळ कधी लक्षपूर्वक ऐकली आहेत. ती त्या पानांच्या पसाऱ्यात कुठेतरी एका ठिकाणी सुरु होते आणि काही क्षणात वृक्षाची सगळी पान एका लयीत हलतात (resonate) आणि जशी अचानक सुरु होते तशीच क्षणात थांबते. रात्री उशीरा जेव्हा बाकी सगळे आवाज बंद होतात तेव्हा ह्या सळसळीची आवर्तने अनुभवण्यासारखी असतात. एखादी हलकी झुळूक त्या पानांच्या पसाऱ्यातून वाट काढत सळसळत जाते तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही.

पिंपळाच सौंदर्य त्याचा डौल, थाट सगळ सगळ त्या पानांच्यात आहे. या वैशाखात तुम्ही कोणी पिंपळाला पालवी येताना पहिलीत का? मी पहिली, मी पाहतो, त्याची पानगळ आणि पालवी दरवर्षी पाहतो अगदी न चुकता बरोबर कोणी असेल तर त्यालाही दाखवतो. बघण्यासारखा, दाखवण्यासारखाच सोहळा असतो तो. लहानात लहान झाड अगदी दोन तीन पान घेऊन भिंतीच्या खबदाडीतून आलेलं असो वा अगडबंब खोडासाहित जटाधारी महावृक्ष असो, त्यांचा पालवी मोहोत्सव एकसारखाच असतो. नियम एकच, झाडून सगळीच्या सगळी जुनी पान त्यागून नवीन साज चढवायचा. अस जरी असलं तरी प्रत्येक झाडाची स्वतःची एक खासीयत असते. प्रत्येकाची तऱ्हा निराळी.

काहीना इतकी घाई असते कि रातो रात आपली जुनी पान गाळून बेटे तयार असतात नवीन कपडे चढवायला. शाळेतून घरी आल्याबरोबर शाळेचा गणवेष बदलून क्षणात खेळायला धावण्यारा एखाद्या मुलासारख तर दुसरा, शर्ट काढलाय आणि टंगळ मंगळ चालली आहे आईची हाक आल्याशिवाय गाड पुढे जातच नाही अगदी तद्वत निम्म्यापेक्षा जास्त पान गळून पडली आहेत पण बाकीच्यांचा मोह काही सुटता सुटत नाही. ती तशीच रेंगाळत असतात आणि आधी गळलेल्या पानांच्या जागी नवीन धुमारे फुटले रे फुटले कि दचकून उठल्यासारखी गळून पडतात.   

पानगळती नंतरचा एखादा दिवस त्याच्या विराट फांद्यांच, विस्ताराच सुस्पष्ट दर्शन होत. एखादा  बैरागी जणू सर्वसंग परित्याग करून आपले हात उभारून परमेश्वराच्या कृपाप्रसादाची वाट बघत असतो. आभाळाशी स्पर्धा करणाऱ्या फांद्या जणू पालवीला आवाहन करत असतात आणि मग दुसऱ्याच दिवशी जिथे पहिली पान होती त्या प्रत्येक जागी लाल, किरमिजी धुमारे दिसायला लागतात. पहिल्या दिवशी फांद्या फांद्यात हे कोंब दिसतात, त्यानंतर त्यांची वाढ इतक्या वेगाने होते को रोज सकाळी त्यांचा वाढलेला आकार आणि बदलेला रंग मनाला अचंबित करतो. हि नवीन पान इतकी नाजूक आणि तलम, मुलायम असतात पारदर्शक वाटतात. त्यांचा स्पर्श? वर्णन करण खूप कठीण आहे. अनुभवल्या शिवाय कळणार नाही. सांगायचच झाल तर नवजात शिशूच्या तळव्याचा स्पर्श त्याच्या जवळ पास जाऊ शकतो.

आता अख्खा पिंपळ लाल, किरमिजी रंगाच्या अनंत छटांनी नटलेला दिसतो आणि एक गंमत, सगळ कस शांत शांत असत, ती इवलीशी पान आजही हलत असतात पण सळसळ बिल्कुक बंद. सुरवातीच्या लाल, किरमिजी रंगात पोपटी रंगाच्या छटा दिसू लागतात. लाल गुलाबी रंगापासून ते हिरव्या रंगा पर्यंतचा तो पानांचा प्रवास बघून डोळे तृप्त होतात. रोज रंगाची नवीन छटा, अविष्कार असतो तो लाल गुलाबी रंगांचा, त्या रंगाना नाव देताच येणार नाही.
दावण्या हा रंग सोहळा शब्द माझे तोकडे
पाहण्या तव चक्षुंनी व्हा जरासे मोकळे ।।

हाहा म्हणता पिंपळ आपल्या स्व-रुपात पुन्हा उभा राहतो. तीच सळसळ तोच गंभीर चेहरा जणू काही घडलेच नाही. मला तर नेहेमी वाटत याला अश्वत्थ म्हणतात याच कारण त्याची केवळ नैसर्गिक आर्युमर्यादा नसून पाना पानात अथक चालेले हे जन्म मृत्युच चक्र आणि त्या पासून अलिप्त असेलेले त्याचे व्यक्तिमत्व हे हि असेल कदाचित.  

याच वेळेला दिसतात ती पिंपळाची फळ, चण्यामण्यां बोरांच्या आत बाहेरचा आकार. कधी बघायची वेळच येत नाही आणि पानात सहजी दिसत देखील नाहीत. पानांच्या बेचक्यातून गुच्छा सारखी लागतात, हिरव्या मातकट रंगाची. हातात घेऊन हलकेच दाबली तर फुटतात. आत अन्जीरासारख्या अनंत बीया. अंगठ्याच्या नखावर तीस-चाळीस सहज मावतील. त्या बघितल्यावर ...एका बीजा पोटी तरु कोटी कोटी ..... गाणं आठवल्या शिवाय रहात नाही. त्यावरची कावळ्यांची घरटी, आधाराने राहणारे खारी सारखे प्राणी आणि सकाळ संध्याकाळ किलबिलाणारे पक्षी. पिंपळ स्वतःच एक परिपूर्ण परिसंस्था (ecosystem) आहे. निसर्गासारखा दुसरा किमयागार नाही.

कालच माझ्या या सगळ्या मित्रांचा खरतर बुजुर्गांचा, थोरांचा दोन्ही हातांनी घट्ट मिठी मारून निरोप घेऊन आलो. सोमवारी चर्चगेट स्टेशन पासून ऑफिसला जाताना त्यातलं कोणी भेटणार नाही मला.

Friday, 26 May 2017

लोकल प्रवास




मी बरीच वर्ष मुंबईत राहून देखील लोकल च्या प्रवास पासून वाचलो होतो. पण गेले वर्षभर लोकल प्रवास बोकांडी बसलाय. (म्हणजे नेमक कुठे याची कल्पना नाही पण शब्दावरून तरी जागा अवघड असावी असे वाटते) सुरवातीला जाम म्हणजे जाम कंटाळा आला. वाचण्याचा (पुस्तक) प्रयत्न केला पण त्या छोट्या जागेत इतक्या मोठ्या प्रमाणात माणस कोंबलेली असतात कि काही विचारू नका (मेंढरा सारखी म्हणणार नाही कारण ती देखील एकमेकां वर बसत नाहीत). वाचण्याचा नाद लवकरच सोडून दिला. एक दिवस जाता येता बाहेर बघितल्यावर ती हौस देखील भागली. झोपण्याचा प्रयत्न केला पण लवकरच लक्षात आल कि आपली अजून तितकीशी प्रगती झालेली नाही.

अचानक, डोक्यावर गरागरा फिरणाऱ्या पंख्याखाली एक दिवस बोध झाला कि जे नित्य आहे ते लोकलच्या डब्या बाहेर आहे व जे वैविध्यपूर्ण आहे, सतत बदलत आहे ते या डब्यात आहे.
या ज्ञानाचा उपयोग करायला मी ज्या क्षणाला सुरवात केली तेव्हापासून माझा प्रवास सुकर झाला. त्या चाळीस-पन्नास मिनिटाच्या प्रवासात तुमच्यातील ज्ञाता जर जागा असेल तर ज्ञेयाची जाणीव व्हायला वेळ लागत नाही आणि तद्नंतर झालेल्या ज्ञानाचे वर्णन, शब्दात करणे केवळ अशक्य आहे. ह्यां त्रुटीची  कल्पना असूनही हा माझा एक प्रयत्न. पुरुषांचा डबा असल्यामुळे काही वाचकांना त्यात म्हणावी तशी रंजकता वाटणार नाही, पण त्याला माझा नाईलाज आहे.
माणसांचे किती प्रकार, प्रकार? आकार! काही जण डब्यातील गर्दीची जन्माजात कल्पना असावी म्हनून अंग चोरूनच जन्माला आलेले, तर हे अंग चोरून जन्माला येणार म्हणजे आपसूकच आपल्याला जास्त जागा मिळणार याची खात्री असल्यागत काही सर्वांगांने समृद्ध आणि बाकीचे आमच्या सारखे, उरलेल्या जागेत सर्व साधारण मावू शकतील असे.
हे वैविध्य आकारापूरते मर्यादित नाही, रंगात देखील काही कमी छटा नाहीत. खरतर गोरा आणि काळा  हे दोन रंग पट्टीच्या दोन टोकाला ठेवायचे आणि गोऱ्या पासून काळ्या कडे शक्य तितक्या हळू जाताना जितक्या म्हणून छटा तुमच्या मन:चक्षु पुढे आणता येतील तेव्हढ्या छटा इथे बघायला मिळतात. नाही म्हणायला हल्ली काही तरुण तोंडाला काही बाही लावून आल्या सारखे दिसतात. त्यांच्या भुवयांचा आकार देखीलं नैसर्गिक वाटत नाही असो.
डोक्याचे किती प्रकार, हो, बरोबर वाचलत, डोक्याचेच म्हटलं मी. काळ्या भोर दाट केसांनी झाकलेल्या पासून ते ह्या पठारावर ते कधी उगवलेच नाहीत इतपर्यंत सगळे प्रकार दिसतात. काही डोकी अशी कि चेहेरा कुठे संपलाय हे लक्षातच येत नाही, तर काही केसांना बाजूला करून मधूनच वाढल्यागत डोकावत असतात. डोकावणे हा शब्द बहुदा या वरूनच आला असावा, शब्द व्युत्पत्ती शास्त्रातील तज्ञांनी यावर प्रकाश टाकावा. माझी खात्री आहे तो परावर्तीत होईल. तर काही उत्तर ध्रुवावरून दक्षिण ध्रुवाला झाकण्याचा किंवा पूर्व किनाऱ्यावरुन पश्चिम किनारा झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारी.
त्या खालील नाकाच्या तऱ्हा किती म्हणून सांगू? असही मराठी भाषेने नाकाच वर्णन करायला अनंत विशेषण आधीच निर्माण करून ठेवली आहेत. नकट, अपर, बसक, फेंदारलेल, सरळ आणि फारच झाल तर म्हशीनी पाय दिल्यासारखं. लोकलच्या डब्यात आणखीन काही नमुने पहायला मिळतात. हा पुढे जाऊन अग्निहोत्री होणार तेव्हा धुराच्या ऊर्ध्व गमनार्थ त्याच्या नाकापुड्यांची रचना कशी असावी हे त्या विधात्याने जन्मत:च योजून केलेली असते. काही नाकाची रचना जणू चष्मा ठेवाण्यासाठीच असते.
लोकल प्रवास हि खरतर एक  आध्यात्मिक साधनाच आहे. पातान्जलीने योग सूत्रात सांगितलेली बहुतेक आसन हे योगी सहज सिद्ध करत असतात. काही नाव घ्यायची झाल्यास, एकपादासन, उभे असणारे  बहुतेक जण ह्या आसनातच दिसतील. गाडीत चढताना वर धरलेली डब्याची बँग खाली न आणता आल्यामुळे काही ताडासनाचे फायदे अनुभवत असतात. द्विपादासन, आपला पाय ठेवायला जागा न मिळाल्यामुळे दुसऱ्याच्या पायावर पाय ठेवून उभे रहाणे. हे आसन वर वर जरी सोपे वाटले तरी ते चुकण्याची शक्यता खूप मोठी असते आणि हे आसन चुकल तर त्याचे परिणाम ज्याने त्याने स्वतः अनुभवयाचे असतात. अन्गुष्टासन, वक्रासन आणि तुमची उंची ठरावीक पातळीच्या खाली असेल तर प्रणायामाचे विविध प्रकार साध्य असावेत अन्यथा, या योगात तुम्हाला गती नाही.
योग मार्गाचा अवलंब सर्वच जण करू शकतील अस नाही, त्यांच्या करता इथे भक्ती चा महामार्ग उपलब्ध आहे. अस म्हणतात कि भक्ती मार्गासारखा सोपा मार्ग नाही,, पण मला विचारलं तर शहाण्यानी त्या मार्गात (डब्यात) जाऊ नये हे खर. भजनी मंडळी आपल्या भजनांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वारास त्यांच्या योग निद्रेतून जागे करून आपआपल्या वाहनावर स्वार होऊन सत्वर पुढच्या स्टेशनवर हजर करण्याच्या प्रयत्नात असतात. त्या नाद्स्फोटात जर तुम्ही सापडलात तर चराचरात भरून राहीलेला देव कुठल्याही क्षणाला देह सोडून कानावाटे स्वर्ग लोकी मार्गस्थ होईल याची मला खात्री आहे.
हि योग साधना नियमित केल्यामुळे, प्रवाशांना स्थितप्रज्ञ व्हायला वेळ लागत नाही. काहींची प्रगती फारच शीघ्र असते किंवा योगायोग असावा पण अगदी थोडक्या प्रवासात देखील त्यांना मोहात अडकवून ठेवणाऱ्या अनेक गोष्टींपासून मुक्तता मिळते उदा. पैशाचे पाकीट, घड्याळ, मोबाईल इत्यादी इत्यादी. अशा प्रकारे वैराग्याप्रत पोहोचलेल्या या योगी पुरूषाचे पाय मर्दनादी उपचारानंतर फलाटरुपी भूमीला लागतात. काही काळ त्या तरल अवस्थेत राहिल्यावर भौतिक जगाची जाणीव होऊन द्वैत निर्माण होते आणि तो लोकलच्या डब्या पासून वेगळा होऊन स्वतःच्या घराकडे चालू लागतो.
अनुभती इतका ज्ञान प्राप्तीचा उत्तम मार्ग दुसरा नाही!
     


Wednesday, 10 May 2017

The Optimist

Michelangelo: “The sculpture is already complete within the marble block, before I start my work. It is already there, I just have to chisel away the superfluous material.”

I was lucky to get included in the group visiting Lokbiradari Prakalp, Hemalkasa on 8th April 2017. I was destined to meet the divine spirit in human body! The Optimist!!
The man, a budding Doctor came to this place with his great Baba 47 years ago. Baba showed him mountain of fire, which he chose to climb. We, mortals, strive their whole life for worldly pleasures. Scale our success on quantum of pleasures and comforts we have amassed and I am sure, die unhappily. Here was a young man who was neither aware nor wanted to chase any of the dreams of outside world. I say outside world, because his Baba had created world of his own. The world of love, affection, empathy and service. The world constituted of two parts. In one where those who are deprived of love, care and affection and the other with the ones, who were capable of bestowing it. This world was entirely different but within the existing world. The creator, benefactor of this world was an institute in himself. Tornado, which knew no boundaries, it kept going on and on, creating in its trail the vortex, which then became tornado itself. Swiping away agony, pain and sufferings of thousands and thousands and sucking in good souls around the Globe.

I am too small a person to comment or say anything about the mammoth work or contribution of this mighty soul to the society. A lot has been already said, written and rewarded. Rewards! This reminds me there is one hall on Prakalp dedicated to laurels, awards and certificates for their contribution, received from across the World. It is a huge source of inspiration for those who are ready to work for returns, but somehow I got the impression that these are dust collecting work of arts for those who have received it. They were working before the felicitations and continued to do so after.

We reached Hemalkasa little late, tired and exhausted after travelling for 5-6 hours in an AC Traveller. That evening we could not go around the Prakalp. Prakalp has some rules and regulations which are strictly followed by the inmates and, guests are required to do so. One documentary was shown in the evening for the groups visiting Hemalkasa. I was shocked to learn that it took three days of travelling and that too without any guarantee to reach the destination. One had to cross Indrawati, Pamul Gautami, Pearlkota and Bandia rivers and none of them had any bridges to reach the place when the idea germinated way back in 1970. The place simply didn’t exist in any of the maps let alone the tribal who dwell the place. The place was totally cut off during monsoon. What was required to be done? Everything! Place and the people had nothing, I mean absolutely nothing. Tribal had no existence as human.

Today when we saw it there was no sign of what it was years ago. It was transformed in to a world akin to where I came from. There are buildings, hospital, hostels, school, running tap water, fans and coolers and even automated roti maker to make hundreds of roties required for the students, volunteers, all the members working on the Prakalp and visiting guests. Full-fledged computer lab with Dell laptops, internet connections, and tribal students boldly explaining us, how they make use of internet, how they write blogs and discuss movies and world events. Let alone addressing us, same children, few decades ago would have ran away at the sight of urban humans.

Coming to animals, yes his portrait is not complete without his pets. Pets is a wrong word but there is no other word in dictionary, which can define the relation he has with his animals. I can’t say domesticated as the acceptance is mutual. The way he has accepted animals in his world, animals have reciprocated and given him room in their own world. It is very difficult to express in words, one has to see, experience and allow mind to make something out of it. Love alone can transcend to reach them and resonate.

How is it possible? How come the transformer be just like you and me? Questions kept nagging me from the day I returned. Simplest answer is shrug the shoulders and say he is simply great, gifted, all cannot achieve such a feat. Of course all can’t even think of what he has achieved. No doubt he is gifted!!

I wonder the day he reached the jungle with his father and decided to dedicate himself for the betterment of tribal, provide medical aid and education, what would have crossed his mind. We, in fact did ask him this question when we met him during our visit. The answer was exceptionally simple he said ‘We want to do it’ that is all.

He knew he will do it, same way as his father knew it when he started Anandwan, Ashokwan, Somanath, Anand Niketan and so on. It is impossible without conviction. I feel the driving force is urge to offer oneself, but it is not sacrifice. Sacrifice leaves feeling of being obliged. It is absent here, it is total acceptance of the served. When we attend to our own wound or an aliment there is no feeling of giving. The couple works in this manner. It is love, love for mankind, love for good of mankind, love for nature. Love is giving. There is no effort involved in serving, it will come naturally when you are filled to the brim with love. Compassion, concern, kindness devoid of ego, can best describe them. When I met them, I could see what is ‘selfless’. It was not miracle or magic!!

We were lucky, we could spend 40-45 minutes in the presence of both of them and actually talked to them, listened to them. They are so humble, unpretentious that it is hard to believe that Dr. Prakash & Dr. Mandakini Amte have achieved this feat. Dr. Mandakini Amte joined him when she had all the options to choose pleasures. The couple has recognition around the Globe, but we could not see even a glimpse of that aura around them. He talked to every one of us asked about what we do for our living, when my turn came I had a funny feeling in my stomach, do I do anything? Here was man who does everything for living of others what do I say to him? I felt I am seeing new Avatara of Dadhichi Rushi one who gave his life to create Vajra, weapon of destruction for Devas, with difference that this Rushi is doing so for creation. May be he is the Karmyogi, Krishna tried to explain in Bhagwat Geeta. I bowed to both of them, touched their feet to salute them and their deeds. I salute the whole family.

I will end with few lines from Baba Amte’s poem, which he composed on wedding of Dr. Prakash and Dr Mandakini.
The river swelled with the pity they poured
And the love they scattered;
A hand raised to bless the twain,

Woodward, the two went.

Sunday, 2 April 2017

फ्रेंड रिक्वेस्ट


जवळ जवळ पस्तीस-छत्तीस वर्षांनी आज “फ्रेंड्स?” अशी रिक्वेस्ट पुन्हा करता आली. टेक्नोलॉजी दुसरं काय! खरंतर रिक्वेस्ट म्हणजे विनंती, मैत्रीची विनंती? विसंगती वाटते. प्रश्र्न? माझ्याशी मैत्री करशील? चुकतंय काही तरी, अस विचारून मैत्री थोडी ना होते? मैत्र जीवाचं असत, मैत्री होते, करता येत नाही. मैत्री चा रुकार?, स्वीकार?, होकार? जाऊ दे.

“तू मला माझी मैत्रीण वाटतेस, आपण चांगले मित्र होऊ असं मला वाटतं आणि तुला?” अस प्रत्यक्ष भेटीत विचारलं होतं. हो तेव्हा, पस्तीस-छत्तीस वर्षांपुर्वी, आठवतं? मला चांगलं आठवतंय, ती जागा, तो महाविद्यालयाचा व्हरांडा जिथे मी हा प्रश्र्न तुला विचारला होता. अगदी काल घडल्या सारखा आजही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. अगदी तुझ्या चेहेऱ्या वरच्या अविर्भावासकट. हो, म्हणताना जितंमया! असे भाव होते तुझ्या चेहेऱ्यावर आणि डोळे मिस्कील हसत होते, मी मागून येणार आणि हा प्रश्र्न विचारणार याची जणू खात्रीच होती तुला. किंबहुना माझी वाट बघतच तिथे उभी होतीस तू. खूप राग आला होता मला माझा, इतका कसा मी गृहीत धरला जाऊ शकतो? पण तू हो म्हणालीस ह्याच्या आनंदात तो राग कधी विरून गेला ते माझं मलाच कळल नाही. खूप खुश होतो त्या दिवशी. मित्रांनी खूप खेचली, पण कुणा कुणाचाही राग नाही आला.

पुढचे दिवस खूप वेगाने गेले, मैत्रीचे रुपांतर प्रेमात वगैरे. इतर युगुलांच्यात आणि आपल्यात एक फरक होता निदान मला तरी तसं वाटत, चुकत असेन कदाचित. मैत्री करता मी हात पुढे केला, तेव्हढाच काय तो माझा पुढाकार. ब्रेकप, प्रपोज  काय जे आज कालची मुलं मुली एकमेकांना सारखी करत असतात ते सगळ तूच केलस. तू विसरली सुद्धा असशील, इतक्या सहज, बेफिकीरीने  विचारलं होतसं, काय तर “माझं हो आहे, तुझं ?” मी नाही म्हणालो असतो तर? तू नाही म्हणशील या भीतीने माझ विचारायचं कधी धारिष्ट्य झालं नव्हतं, त्यामुळे मी नाही म्हणायचा सवालच नव्हता. हे ही बहुदा तुला माहित होतं.

विसरली असशील, मी मात्र अजून त्या पायऱ्यांशी घुटमळतोय. पुन्हा संधी मिळाली तर? उगाच काय विचार करायचा, आत्या बाईला मिशा असत्या तर ... त्यातली गत. त्या नंतरचा अगदी प्रत्येक क्षण वगैरे नाही पण बरेच प्रसंग मात्र आजही स्मरणात कायम आहेत. नाही म्हणायला काही क्षण चिमटीत तसेच धरून ठेवलेत, पावसात चिंब भिजून घरी परतल्यावर, निरोप घेताना तुझ्या डोळ्यातून जे काही बोललीस, शब्दात सांगणं  अशक्य आहे, इतकं सांगितलंस. जर तुझ्या दारात उभा नसतो, तर कृतीनेच उत्तर दिलं असत. तुझ्या वाढदिवसाला सकाळी उठल्याबरोबर नेमकी आठवण होते, अजून नाही विसरलो ती तारीख.

भेट, पुनर्भेट दीर्घ असावी आणि निरोप थोडक्यात उरकावा, भावनांच्या लाटांनी निग्रहाच्या भिंती कोसळण्यापूर्वी वेगळं होता आलं पाहिजे. असं मानणारा मी, किती वेळ रेंगाळलो. तू मात्र, गळ्यातला एखादा बहुमोल अलंकार हलकेच काढून ठेवावा किवा भेट म्हणून मिळालेल्या नाजूक कलाकुसर केलेल्या काचेच्या  शोपीस वरच्या रिबिनीची गाठ अलगद सोडवावी इतक्या हळुवारपणे त्या नात्यातून बाजूला झालीस. काही काळ जावा लागला मला उमजायला कि मैत्री संपलीय? दुःख झालं ? नाही नेमकं तसंही नाही म्हणता येणार, माझ्या अपेक्षेपेक्षा फारसं वेगळ काही घडल नव्हतं तरी देखील आत खोलवर काही तरी मोडून पडलं. मी कायमचा बदललो.

नाही! मी तक्रार करत नाही. म्हणशील, इतकी वर्षे काय हाच विचार करतं होतास? साचलेल्या पाण्यासारखा? जीवन कस प्रवाही असावं, तूच म्हणायचीस की आणखी कुणी? नाहीं आठवतं. नाही, खरचं अजिबात तक्रार नाही. मी माझ आयुष्य मजेत जगतोय. तुला बर वाटावं म्हणून नाही म्हणत. सुखी संसार केलाय, करतोय. आम्ही सगळेच खूप आनंदी आहोत, एक मेकांवर भरपूर प्रेम करतो.  अनेक भाव भावनांचे अर्थ खरेतर लग्नानंतरच कळले.

तुझ्या मनात आलं असेल ना इतक्या सगळ्या आठवणी कुरवाळत कस शक्य आहे? लग्न करून सुखी संसार वगैरे? तू कधी सिमेंटच्या गीलाव्यावर उठलेली कुत्र्या, मांजराची क्वचित कधी तीन बोट असलेली, कबुतराची किवां कोंबडीची पावलं बघितली असशील. तसचं काहीस आहे हे. माती मऊ ओली असताना उठलेले ठसे आहेत, चिन्ह आहेत,आठवणी आहेत. त्यामुळे त्या तश्या रहाणं  स्वाभाविक आहे. आता वाळून कडक झालेल्या गिलाव्याला त्याच दुःख नाही किंबहुना जाणीव देखीलं नाही.


हां, आता अधेमधे कधी कमी जास्त पाऊस झाला तर पाणी वाहून जातं, गिलावा पटकन सुकतो, पण या पावलांत मात्र पाणी थोडं जास्त काळ राहातं इतकंच काय ते.

Saturday, 25 March 2017

खारे दाणे


स्टेशन ते माझे घर चालत साधारण दहा ते बार मिनिटांच अंतर, जलद चालणाऱ्यां करता त्याहूनही  कमी. मार्केटातून  गेलो तर थोडं जास्त. इतक्या अंतरात देखील एके जागी माझे पाय अचानक थांबतात खरं तर वळतात. एखादया मद्यपी माणसाचे पाय गुत्त्याकडे  वळावेत तद्वत माझे पाय पार्लेश्वर मंदिरा समोरील चणे-दाणे  वाल्याकडे  वळतात, आणि हे असे आजच नव्हे तर मी कमवायला लागल्या पासून गेली कित्येक वर्ष चालू आहे. जर मी स्टेशन वरून चालत आलो तर मंदिरा समोरच्या त्या भडभूंज्याकडे  खारे दाणे घेतल्या शिवाय माझे  पाउल पुढे पडतच नाही.

मला आठवतं ते पार्लेश्वराचे  जुने देऊळ आणि त्याच्या समोर बैठ्या चाळी सदृश्य इमारतीत असलेला हा चणे दाणे वाला. कमरे इतकी उंची असलेल्या भट्टीच्या बाजूला उभे राहून  रेतीने भरलेल्या  कढईत लोखंडी चाळणीने वर खाली करत दाणे भाजणारा भय्या, हे नित्य दिसणारे दृश्य. आता ती चाळ जाऊन तिथे ऊंच इमारत ऊभी आहे, देऊळ देखील खूप प्रशस्त झालं आहे पण तो चणे-दाणे वाला आहे तिथेच आहे, चणे-दाणे विकायला बहुदा त्याची मुले बसतात. बदल म्हणावा तर चण्यादाण्यांबरोबर आता तो शेव, फरसाण , पाणी पुरीच्या पुऱ्या व तत्सम काही बाही विकतो. खाऱ्या दाण्यांची चव आणि खाणारा मी, मात्र तोच आहोत, फरक म्हणाल तर तेंव्हा १० पैशाचे दाणे घेत होतो आता तेव्हढेच दाणे पाच रुपयाला घेतो.

दाणे खात खात घरी जाण्यातली गंमत काही और आहे. मी दाणे सोलून खातो, हो साले रस्त्यातच टाकतो, चूक आहे, पण बायोडिग्रेडेबल का काय जे म्हणतात ना, तसा कचरा आहे हा, म्हणून स्वतःला माफ करतो. खारे दाणे खाण्याचे  काही नियम आहेत. सोलून तोंडात टाकलेला पहिला दाणा संपता संपता दुसरा दाणा तोंडात गेला पाहिजे, दाणा तोंडात टाकतना थोड्या अंतरावरून तो तोंडात गेला पाहिजे,ओठांना हात न लागता. खाण्याचा वेग इतकाच असावा की दाण्यांचा तोबरा होता कामा नये आणि सर्वात महत्वाचा दाणा, म्हणजे पुडीतीला शेवटचा दाणा. चालता चालता तो दाणा खाणे हे एखाद्या बारीक कलाकुसर करणाऱ्या कारगिराला सुद्धा आव्हानात्मक ठरेल इतके कठीण, डाव्या हाताने पुडीचे तोंड  झाकलेले हवे व उजव्या हाताची तर्जनी व अंगठा यांच्या मदतीने पुडीचे शेवटचे टोक घड्याळ्याच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेला इतकेच फिरवावे की टोकाला अडकलेला  दाणा तिथून निसटावा पण पुडीच्या उघड्या तोंडातून त्याने रस्त्यावर आत्मघातकी उडी मारू नये. घडू नये, पण तसे घडलेच तर ते  दुःख शब्दात मांडणारा शब्दप्रभु माझ्या वाचण्यात अजुन तरी आलेला नाही. असो, तो शेवटचा दाणा जग जिंकल्याच्या थाटात तोंडात टाकता टाकता  डाव्या हाताने पुडीचा चोळा मोळा होऊन तो बोळा रस्त्याच्या कडेला फेकला गेला पाहिजे. (आता कचऱ्याच्या डब्यात जातो, घरी पोहोचल्यावर).

काल संध्याकाळी देखील, मी नेहमी प्रमाणे दाणे खात खात निघालो, थोडा पुढे जातो न जातो तर काकूंची हाक कानावर आली. देवळातून दर्शन घेऊन काकू घरी निघाल्या होत्या. काकू, म्हणजे आमच्या शेजारच्या दामले आजी, खरंतर त्यांना आजीच म्हणायला हवं, पण का कोणास ठाऊक,आम्ही सगळे त्यांना काकू म्हणतो. घरातील मोठे त्यांना काकू म्हणतात म्हणून असेल कादाचित. दामले काकूना आम्हा भावंडाचे खूप कौतुक, त्यांना स्वःतला मूलबाळ नव्हतं. मला आठवत, सहावीत जाताना माझी एक तुकडी  गेली तेव्हा माझ्यापेक्षा त्यांनाच अधिक दुःख झालं होतं. माझी समजूत काढताना म्हणाल्या, "गेली तर गेली, चारशे मुलांच्यात तू एकवन्नावा तर आहेस" (५० मुलांची एक तुकडी होती, सहावीमधे  दुसऱ्या तुकडीत गेलो होतो). मी थांबून मागे वळलो, चालत काकूंच्या जवळ गेलो. "काय हो काकू?, पिशवी घेऊ? "
"छे रे, असं काय वजन घेऊन चालले आहे? आणि हे रे काय ?" माझ्या चेहऱ्यावर भले मोठ्ठे प्रश्न चिन्ह, पटकन कपड्यांवर नजर टाकली काही पडलाय का?
"काय काकू?"
"बँकेत एव्हढा मोठ्ठा ऑफीसर तू आणि रस्त्यातून दाणे खात काय चाललायस? लोक काय म्हणतील?"
"काकू, दाण्याचा इतका खमंग वास आला की अगदी राहवलं  नाही, नेहमी नाही खात काही" धडधडीत खोट, पण काकुंच समाधान झालं .
"असूदे रे, माझ्या मेलीच काय ऐकतोस, मनात आलं म्हणून बोलले, राहूदे, बरं  चाललाय ना?"
"हो काकू" थोडा अवघडलो, काकूंच्या चालीने चालायचं म्हणजे? माझी अडचण त्यांच्या लक्षात आली. "अरे गेलास तरी चालेल". पडत्या फळाची आज्ञा मानून मी तिथुन पाय काढला.

प्रसंग अगदी छोटा, का खातो मी दाणे? कारण कदाचित माझ्या बाळपणाशी निगडीत असावं. लहानपणी हट्ट केल्याशिवाय दाणे मिळत नसत, आणि मिळाल्या नंतरचा आनंद! काय वर्णावा तो, अगदी  समाधी अवस्था. जिभेवर रेंगाळणारी ती खारट चव, दाणे कधी संपूच नयेत असच वाटायचं. किती सोप्प होत आयुष्य,आनंद मिळवणं. आज दाणे  खाताना बहुदा खोल कुठेतरी ते तणाव मुक्त बालपण पुन्हा अनुभवास येत असाव. दाणे हे माध्यम बनते माझ्या बाळपणाच्या अनुभूतिशी जोडणारे, नकळत पुनः प्रत्ययाचा आनंद देणारे, खरंच सांगतो, दाणे संपेपर्यंत, माझा ह्या व्यवहारिक जगाशी सम्बन्ध तुटतो आणि नकळत मी तणाव, चिंता ग्रस्त - माझ्या पासून खूप खूप लांब जातो. असेल का असं? अंन्तरमनात कोणत्या गोष्टीची  सांगड कशाशी घातलेली असेल सांगणं,  फार कठिण आहे. माझ्या बाबतीत म्हणाल तर खारे दाणे आणि तणाव, चिंता, भीति मुक्त स्वच्छंदी जगणे ह्यांची कुठेतरी खास जोडणी आहे. दाणे देखील खूप सारे नाहीत त्या पुडीत मावतील इतकेच, नाहीतरी मनाची तरल अवस्था फार काळ टिकायला मी योगी थोडाच ना  आहे?

Saturday, 11 March 2017

Dream Merchants


I feel today is the right moment to write my last post on the subject. Elections across the country are more or less over, results are out, exit polls and trends don't matter anymore.

The game has reached penultimate stage before the party begins. Drawn swords are about to be scabbard, dried blood is being cleaned to pretend that there wasn’t any blood on them. We never fought, we were always together!!

Politicians will take the back sit and tough negotiators will be in forefront, wherever none of the parties have secured clear mandate.  Those who have read my earlier post will remember I had written that in politics, enemies or opponents are never forever, it is always a marriage of convenience or clash of interests. There is no way out for poor voters even though they keep experiencing this, election after election.

There is nothing new!!

You will find analyst analysing election results, after every election, I don’t know whether you have noticed some of the common terms you keep hearing during the analysis ‘anti-incumbency vote’, ‘polarisation’,  ‘vote Banks’, ‘wave’, ‘swing’ and after Mr. Modi’s entry on the stage ‘Development’, ’Change’ have become buzz words.  Voters have once again proven exit polls wrong, exit polls are for media. Debates and discussions are seen, heard and enjoyed by public generating great TRP. According to me exit polls are popular because of our desire or longing to peep in to future. Whoever or whatever is apparently successful in creating an illusion of being a prophet or a seer can easily be the crowd puller. The way any fortune-teller under Banyan / Peepal tree brags about the only correct prediction (that too by utter coincidence), media channels do exactly the same.

Most of the analysts believed that, though all the political parties during their campaigns, talked about development, progress of the region, law and order, equality these were only side dishes, main course continued to be polarisation based on cast, religion and economic disparity. Every one of the parties tried the recipes. Political party, which could get the ingredients and cooking time right, finally won. There is more to elections held in India. Sketchily, what analyst say may be true but there is another angle as well. The one, which is ignored by all of them.

Today analysts and intellectuals from all walks of life are debating yesterday’s results. They have come across contradictions. But unfortunately they are not ready to check their premises. If you ask me, we vote for dreams. Indian voters vote by heart. We are idol worshipers. We create heroes and we worship them. Time and again we have proved it. We have sympathy wave, anti-incumbency wave, which runs across the country.  We have landslide victories and we have most unexpected result. Results which can’t be substantiated by any facts. The reason is we vote by hearts. We are emotional. Emotions are not predictable. Emotions are contagious. We believe. No wonder Mahatma Gandhi was great success in India and no wonder he was assassinated. Whoever or whichever party is successful in projecting common man’s desires into dreams, illusions will succeed. ‘Garibi Hatav’, God knows how many different forms it has taken and mind you, every one of them has sold like a hot cake. Contest is of marketing, one who is able to market these dreams is the winner. ‘Dream merchants’ are true winners in our country. Till 1984 we had dream merchants from the same family. Then there was a lull. Enormous gap till 2014. We witnessed successive coalition Governments during the period. Quite a few dream merchants were and are at regional, State level. Maharashtra, Andhra, Tamilnadu has seen a few.  These were Retailers. Whole Sellers are few and apart. We are witnessing one right now.

No don’t get me wrong, being a dream merchant is not, being a cheat, it is just the way to come to power. One has to make voters believe that he is messiah, he is the one who will free them of all their worries and qualms. This is the one or rather the only essential required to come to absolute power.  Unless one has absolute power he cannot work on his agenda. Being a dream merchant is just the way. It doesn’t end there. Once you come to power, you have to deliver else you will be out of stock.

Let us hope these are early morning Dreams!!